मणिपूरला भूकंपाचे धक्के: भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मणिपूरमध्ये आज सकाळच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे
मणिपूरला भूकंपाचे धक्के: भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
मणिपूरला भूकंपाचे धक्के: भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल, नागरिकांमध्ये भितीचे वातावरणSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये Manipur आज सकाळच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.८ इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने NCS याबाबत माहिती दिली आहे. मणीपूरच्या उखरुलमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ मोजली गेली आहेत.

हे देखील पहा-

सकाळी ७.४८ वाजेच्या सुमारास उसरूलपासून ५६ किमी पूर्व-आग्नेयेला भूकंप झाला आहे. या अगोदर गुरुवारी देखील मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी मोइरांगजवळ ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याची खोली दक्षिण-आग्नेय ५७ किलोमीटरइतकी होती. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने सांगितले होते की, 'रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रतेचा भूकंप सकाळी ६ वाजेच्या सुमारास झाला होता.

मणिपूरला भूकंपाचे धक्के: भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपट गाजला; शंभर कोटी रुपयांची कमाई

मात्र, यामध्ये कोणते देखील नुकसान झाल्याचे वृत्त समोर आले नाही. भूकंपाचे मोजमाप सिस्मोग्राफद्वारे केले जाते. भूकंपाच्या क्षणाची तीव्रता पारंपारिकपणे मोजली जाते किंवा सापेक्ष आणि अप्रचलित रिश्टर तीव्रता घेतली जाते. ३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप सामान्य आहे, तर ७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे गंभीर नुकसान होत असते. भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेच्या हानीसह अनेक रोग होत असतात.

इमारती, धरणे, पूल इत्यादींमुळे पृथ्वीच्या अणुऊर्जा केंद्राचे नुकसान होते. भूकंपामुळे भूस्खलन आणि हिमस्खलन होतात. यामुळे डोंगराळ भागात नुकसान होते. याशिवाय वीजवाहिन्या तुटल्याने आग लागू शकते, तर भूकंपामुळे समुद्राखाली त्सुनामी येऊ शकते.भूकंपामुळे धरण फुटल्यास पूर देखील येऊ शकतो.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com