kharip hangam 2022, pradhan mantri pik vima yojana 2022  saam tv
ऍग्रो वन

शेतक-यांनाे! नऊ पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश; जुलै अखेर करा अर्ज

अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधा.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम 2022 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. (pradhan mantri pik vima yojana 2022 marathi news)

जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडळनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या नऊ पिकांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2022 ही अंतिम मुदत आहे याची दखल शेतक-यांनी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी (farmers) फक्त दाेन टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत (dcc bank) आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरण्याविषयाचे तसेच अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन (satara) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT