PM-Kisan Samman Nidhi 12th installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १२ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत.
यावेळी केंद्र सरकारने १२ वा हप्त्यासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या पूसा कॅम्पसमध्ये आयोजित पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी १२वा हप्ता जारी केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ६०० शेतकरी समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन केले.
भारतीय कृषी संशोधन संस्था येथे आयोजित केलेला हा मेळावा दोन दिवस असेल. यात मोठ्या संख्येने शेतकरी कृषी क्षेत्रात काम करणारे तरूण, शास्त्रज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात देशभरातील साडेतेरा हजार शेतकरी, १५०० कृषी स्टार्टअप एकाच मंचावर असतील. या मेळाव्यात विविध संस्थांमधील एक कोटीहून अधिक शेतकरी ऑनलाइन सहभागी होतील, असा दावा करण्यात येत आहे.
कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना १२ हप्त्यांत जवळपास एकूण २ लाख कोटी रुपयांहून अधिक लाभ मिळालेला आहे. त्यातील १.६ लाख कोटी रुपये केवळ कोविड महामारीच्या काळात ट्रान्सफर केलेले आहेत. या योजनेंतर्गत १२वा हप्ता खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आपापले बँक खाते तपासून बघावे.
बँक खाते कसे चेक कराल?
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. डाव्या बाजूला Farmers Corner असा एक पर्याय दिसेल. त्यामधील Beneficiary Status यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज खुले होईल. लाभार्थीचा आधार क्रमांक, बँक खात्याचा क्रमांक आणि मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. एक पर्याय निवडल्यानंतर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर Get Data वर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थीचे सर्व हप्ते याबाबत सर्व माहिती दिसेल. आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत, कोणत्या खात्यात पैसे जमा झालेत याची सर्व माहिती मिळेल.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.