Gold Price : सोन्याच्या किमतीत वाढ, चांदीही महागली; तरीही सोनं उच्चांकी दरापेक्षा 5700 स्वस्तात खरेदीची संधी

Gold Price Today
Gold Price TodaySaam tv
Published On

मुंबई : सणासुदीच्या काळात सोनं (Gold) खरेदीकडे नागरिकांचा कल जास्त असतो. दिवाळीतही सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच लग्नसराईचा मौसम सुरु झाल्याने देखील सोनं खरेदीत वाढ होत आहे. तुम्ही देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज काही जास्त पैसे मोजावे लागलीत. कारण सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत सातत्याने घट झाल्यानंतर आज सोन्याचे भाव वाढले आहेत. तर चांदीचा (Silver) भाव कालच्या तुलनेत स्थिर आहे.

सोन्याचा दर पुन्हा एकदा प्रति 10 ग्रॅम 51000 रुपये तर चांदीचा दर 56000 रुपये प्रति किलोच्या जवळपास आहे. सध्या सोनं त्याच्या उच्चांकी किमतीपेक्षा 5700 रुपयांनी तर चांदी 23900 रुपयांनी स्वस्त विकलं जात आहे.

Gold Price Today
VIDEO: 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय'; अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक

मल्टिकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर, सोने डिसेंबर फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी किंवा 151 रुपयांनी वाढून 50,830 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत आहेत. एमसीएक्सवर, चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 0.79 टक्क्यांनी किंवा 438 रुपयांच्या वाढीसह 55664 रुपये प्रति किलोवर व्यवहार करताना दिसत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा डिसेंबर फ्युचर्स 50,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 55,226 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. (Maharashtra News)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं महागलं

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड 0.16 टक्के किंवा 2.65 डॉलरसह 1650.25 डॉलर प्रति औंसवर आहे. तसेच चांदी 0.22 टक्क्यांनी वाढून 18.44 डॉलर प्रति औंसवर आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि केरळमध्ये सोन्याचा दर 50,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिल्ली, जयपूर आणि लखनौमध्ये सोन्याचा दर 50,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, जयपूर आणि लखनौमध्ये चांदीचा दर 55,300 रुपये प्रति किलो आहे.

Gold Price Today
Andheri By-Poll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; राज ठाकरे, शरद पवारांच्या आवाहनानंतर एका रात्रीत असं काय घडलं?

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com