VIDEO: 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय'; अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक

राज ठाकरे यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली असं म्हणत पटेल यांनी ही घोषणाबाजी केली.
VIDEO: 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय'; अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक
Published On

मुंबई : अंधेरीमध्ये (Andheri) भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि भाजपविरोधात घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली असं म्हणत पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली.

'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय' अशी घोषणाबाजी मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मुरजी पटेल यांच्यावर अन्याय झाला आहे. काही कार्यकर्त्यांना अश्रूही अनावर झाले. मुरजी पटेल यांना विश्वासात घेतलं नाही. सगळी तयारी आम्ही केली होती. आमचा विजय पक्का होता, असं म्हणत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

VIDEO: 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय'; अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक
Andheri By-Poll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; राज ठाकरे, शरद पवारांच्या आवाहनानंतर एका रात्रीत असं काय घडलं?

मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता- पटेल

पक्षाने मला उमेदवारी दिली आता माघार घ्यायला सांगितली. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबातही नाराज नाही. मी पक्षाचा आदेश मान्य करतो. पक्षाने याबाबतचा निर्णय सांगताच एकाही मिनिटाचा विचार न करता अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती मुरजी पटेल यांनी दिली. यापुढेही मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत राहील. पक्षाचा आदेश माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असंही त्यांनी म्हटलं.

VIDEO: 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय'; अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक
Andheri By-Poll : अंंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा ते भाजपची माघार... दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या निवडणुकीचा संपूर्ण घटनाक्रम

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने माघार घेतली आहे. उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज परत घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. आम्ही अर्ज परत घेत आहोत, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मुरजी पटले हे अपक्ष देखील निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रमेश लटके यांना आदरांजली म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. पराभव दिसत असताना माघार घेतली असं कुणाला वाटत असले तर त्यांना 2024 मध्ये दाखवून देऊ असं आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com