Bazar Samiti Election, parbhani saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : परभणीत भाजप, सेना कार्यकर्त्यांत जुंपली; कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडी जाहीर

या निवडीनंतर पदाधिका-यांनी जल्लोष करीत फटाके फोडले.

राजेश काटकर

Parbhani APMC News : परभणी जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी आज (साेमवार) आज झाल्या. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी काँग्रेसचे पंढरीनाथ घुले यांची निवड झाली आहे. या जिल्ह्यातील सोनपेठ बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे दशरथ सूर्यवंशी पाटील तर उपसभापती पदी उत्तम नेमाजी जाधव यांची, पाथरी बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे अनिल नखाते तर उपसभापती पदी लोणीचे माजी सरपंच शामभाऊ धर्मे यांची वर्णी लागली आहे. (Maharashtra News)

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (parbhani krushi utpanna bazar samiti) सभागृहामध्ये सभापती आणि उपसभापती पदाची निवड चालू होती. यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच नेते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी खासदार संजय जाधव (mp sanjay jadhav) आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील (mla dr rahul patil) यांना सभापती, उपसभापती पदाची निवड झाली असल्याचे सांगितल्याने नवनियुक्त सभापतींचा सत्कार करण्यासाठी सभागृहात गेले.

तेथे निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती पण खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील सभागृहात का आले यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजप पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. यानंतर तात्काळ खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील हे सभागृहाच्या बाहेर आले आणि वाद निवळला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...

Jolly LLB 3: कोर्टात दोन जॉली देणार कॉमेडीचा ट्रिपल डोस; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी येणार आमने-सामने

Solapur Rain : दक्षिण सोलापुरात पावसाचा हाहाकार; अनेक गावांना फटका, शेतात पाणीच पाणी

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!

SCROLL FOR NEXT