parbhani and nanded farmer earns lakhs of rs from bhendi and gobi farming Saam Digital
ऍग्रो वन

पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

Drought In Nanded And Parbhani : एकीकडे पाण्याची भीषण असताना देखील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात शेतकरी नवनवीन उपक्रम राबवित शेती करीत आहेत. यामुळे शेतक-यांना भरघाेस उत्पन्न मिळत आहे.

Siddharth Latkar

- राजेश काटकर / संजय सूर्यवंशी

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील दस्तापूर येथील शेतकऱ्याने अर्धा एकर शेतामधून लाखमोलाच्या भेंडीचे उत्पन्न घेतले आहे. सर्वत्र पाण्याअभावी रखरखाट असताना या शेतकऱ्यांने पाण्याचं काटेकोर नियोजन करून भेंडीचे पीक घेतल्याने त्याची सर्वत्र चर्चा आहे. दूसरीकडे नांदेड जिल्ह्यात देखील शेतक-यांनी गाेबी, टरबूज याची लागवड करत भरघाेस उत्पन्न मिळवले आहे.

दस्तापुर येथील गणेशराव पुदगाणे हे हंगामी पिके घेतात. यावर्षी त्यांनी वीस गुंठ्यात बोनस पिक म्हणून भेंडी घेतली आहे. सध्या बाजारभाव चांगला मिळत असून एक लाख रुपये भेंडीच्या उत्पनातून मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या भेंडीचा सोळावा तोडा झाला आहे. हे भाजीपाला वर्गीय पीक पुढे दोन महिने चालणार आहे. या कडक उन्हातही भेंडीचा फड हिरवा गर्द असून वेळेवर खतपाणी मिळत असल्याने फुल धारणा चांगल्या पद्धतीने होत आहे असे शेतक-याने सांगितले.

सुजलेगावातील शेतक-याने गोबी लागवडीतून मिळविले भरघाेस उत्पन्न

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकऱ्याने गोबीची लागवड केली. गोबी लागवडीतून या शेतकऱ्याने चांगले उत्पन्न घेतले आहे. सुभाष जाधव असे गोबी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.

जाधव यांनी आपल्या 30 गुंठे शेतीत गोबीची लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करून वाढत्या तापमानात देखील त्यांनी गोबीची शेती फुलवली. 30 गुंठे गोबी लागवडीतून जाधव यांना 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने गोबीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. गोबी काढणी सुरू असून जाधव यांना अजून एक लाख रुपये गोबी लागवडीतून मिळण्याची अपेक्षा आहे.

टरबूज शेतीतून लाखाेंचे उत्पन्न

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याने टरबूजाच्या शेतीतून लाखों रुपयांचं उत्पन्न मिळविले. सुभाष पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पवार यांनी आपल्या दिड एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली आहे. टरबूज लागवडीसाठी त्यांना साठ हजार रुपय खर्च आला. खर्च वगळता टरबूज लागवडीतून त्यांना दिड लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज पवार यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात अस्वलाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी

Hair Colour: हेअर कलर करायला आवडतं? पण शरीरावर होणारे 'हे' गंभीर परिणाम वाचाच

गाडी चालवताना अचानक हँडलमधून आवाज, पाहिलं तर आत लपलं होतं अजगराचं पिल्लू, पाहा थरारक VIDEO

Virat Kohli Retirement : विराट कोहली IPLमधूनही 'रिटायर' होणार, सहकाऱ्याच्या दाव्यानं भुवया उंचावल्या

Mega Block : मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास? कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT