Farmer Saam tv
ऍग्रो वन

Farmer : भाजीपाल्याच्या दरात घसरण; शेतकरी संतप्त, कुर्डुवाडी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

Pandharpur News : उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानंतर दरात मोठी वाढ होत असते. मात्र यंदा चित्र उलटे असल्याचे पाहण्यास मिळत असून यंदा भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे

भारत नागणे

पंढरपूर : शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याचे दर मागील काही दिवसांपासून घसरले आहेत. अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे. यामुळे आज कुर्डुवाडी येथील बाजारात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. भाजीपाला आणि शेतीमाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकर्यांनी बाजार समितीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानंतर दरात मोठी वाढ होत असते. मात्र यंदा चित्र उलटे असल्याचे पाहण्यास मिळत असून यंदा भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांपासून भाजीपाला व शेतीमालाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अर्थात भाजीपाला उत्पादनासाठी लावलेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. 

शेतकरी आर्थिक अडचणीत 

भाजीपाला पिकांना पाच रुपये किलो सुद्धा दर मिळू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मंडईत विक्रीसाठी आणणे परवडत नाही. दर पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. सरकारने शेतकऱ्याला कर्जमाफी जाहिर करून आर्थिक अडचणीत आलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी गणेश घुगे यांनी केली आहे. 

प्रतिकात्मक पुतळ्याला कांदे, बटाट्याचा हार 

शेतीमालाला व भाजीपाल्याला हमीभाव मिळावा; या मागणीसाठी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकऱ्यांनी कुर्डूवाडी बाजार समितीमध्ये आंदोलन केले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वांगी, कांदा, बटाटे यांचा हार करून घालून निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT