krushi utpanna bazar samiti, election saam tv
ऍग्रो वन

APMC News : फिफ्टी फिफ्टीतून एक फुटला... अर्जुनी माेरगावात 'मविआ' ची सरशी; पालम, चांदवड, देवळा बाजार समिती सभापती बिनविराेध

पदाधिकारी निवडी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

Siddharth Latkar

- अजय साेनवणे, राजेश काटकर, शुभम देशमुख

APMC Chairman Election News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीची प्रक्रिया अजून सुरु आहे. राज्यातील पालम, चांदवड, देवळा, अर्जुनी माेरगाव बाजार समितीच्या पदाधिका-यांची निवडी आज (मंगळवार) झाल्या. या निवडीनंतर पदाधिकारी यांच्या सर्मथकांनी बाजार समितीच्या आवारात जल्लाेष केला. (Maharashtra News)

पालमला रोकडे, पाैळ यांच्या गळ्यात माळ

पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (palam krushi utpanna bazar samiti) सभापतिपदी गजानन रोकडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी भाऊसाहेब पौळ यांची निवड झाली.

पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तब्बल 14 जागांवर विजय मिळवत राष्ट्रीय समाज पक्षाने बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली हाेती. यापूर्वी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी आणि शेकापची सत्ता होती. यावेळेस राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला.

आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वात रासपने बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली. आज सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी येथील बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाल्या. यावेळी पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी रासपाचे गजानन गणेशराव रोकडे तर उपसभापतिपदि शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब पौळ यांची निवड करण्यात आली.

देवळ बाजार समितीत आहेर, पवारांची वर्णी

नाशिकच्या देवळा बाजार समितीच्या (devla krushi utpanna bazar samiti) निवडणूकी नंतर आज सभापती व उपसभापती निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीने येथील जागा जिंकल्यानंतर आज झालेल्या सभापतिपदी शेतकरी विकास पॅनलचे योगेश आहेर तर उपसभापतिपदी अभिमान पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

चांदवडला निवडी बिनविराेध

नाशिकच्या चांदवड बाजार समितीच्या (chandwad krushi utpanna bazar samiti) निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला धक्का देत महाविकास आघाडीने आपला झेंडा रोवला होता. माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीत महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली. आज सभापती व उपसभापतीची निवडणूक बिनविरोध झाली.

यामध्ये सभापतिपदी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष संजय जाधव यांची निवड झाली तर उपसभापतिपदी उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कारबारी आहेर यांना बिनविरोध निवडल्याने कार्यकत्यांनी मोठा जल्लोष केला.

महाविकास आघाडीची सरशी

गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मोरगाव अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समीतीवर महाविकास आघाडीने कब्जा केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी 9 संचालक निवडणून आले होते. त्यामुळे 50-50 असे समीकरण असताना भाजपचे 1 संचालक महाविकास आघाडीकडे आल्याने कृषी उत्पन्न बाजार सभापती पदावर यशवंत परशुरामकर तर उपसभापतीपदी अनिल दहिवले यांची निवड झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT