Kalyan Railway Station News : कल्याण रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळाबाजार ? प्रवाशांना मारहाण, सुसाट टोळीला मनसेचा इशारा

या प्रकरणात दलालांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पाेलीसांकडून देण्यात आले.
Kalyan Railway Station, Kalyan News, Rail Tickets
Kalyan Railway Station, Kalyan News, Rail Ticketssaam tv
Published On

- अभिजित देशमुख

Kalyan News : मेल एक्सप्रेसचे तिकीट घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभे असलेल्या एका प्रवाशाला तिकीट दलालांनी काल रात्रीच्या सुमारास मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशन (kalyan railway station) परिसरतील तिकीट आरक्षण केंद्रावर घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात (kalyan railway police station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे तिकीट दलालांची दादागिरी समोर आली आहे. (Maharashtra News)

Kalyan Railway Station, Kalyan News, Rail Tickets
Maharashtra Accident News : महाराष्ट्रात मंगळवार ठरला घातवार ! किंकाळीचा आवाज येताच गाड्या थबकल्या, मायलेकींचा झाला होता...

सुट्ट्यांमध्ये कल्याणहून (kalyan) परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कल्याण रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. सामान्य प्रवाशाला तिकिटासाठी वणवण करावी लागते. अनेकदा तर पूर्ण दिवस तिकीट (rail tickets) आरक्षण केंद्रावर रांगेत उभे राहावे लागते, तरीही तिकीट मिळत नाही .

दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. प्रवाशांनी यावेळी दलालांविरोधात आवाज उठवल्यास या दलालांकडून दादागिरी व मारहाण केली जाते. अशा घटना आता कल्याण रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्र परिसरात सातत्याने घडताहेत.

Kalyan Railway Station, Kalyan News, Rail Tickets
Palghar Accident News : बोईसर नवापूर रस्त्यावर Car आणि Bike ची धडक, कामावरून घरी निघालेल्या दाेघांचा मृत्यू

साेमवारी रात्री प्रवाशाला झाली मारहाण

कल्याणहून बनारसला जाण्यासाठी संतोष राय हा तरुण सलग तीन दिवस आरक्षण केंद्रात रांगेवर उभा होता. पहिल्या दिवशी त्याचा ५० बा नंबर होता तिकीट मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच साेमवार (ता.22) त्याच्या ११ वा नंबर होता. रात्री अकरा वाजता सुमारास संतोष रांगेत उभा असताना काही जण त्या ठिकाणी आले व थेट रांगेत घुसले.

त्यांनी स्वतःचे नंबर लावायला सुरुवात केली. संतोष राय यांनी विरोध केला आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, मात्र दलालांकडून संतोष यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून मोबाईल मधील व्हिडिओ डिलीट करण्यात आले.

Kalyan Railway Station, Kalyan News, Rail Tickets
Pune Water Cut News : पुणेकरांनाे ! 'या' दिवशी तुमच्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या 'रोटेशन' पद्धत

प्रवाशांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई व्हावी

या प्रकरणाची कल्याण जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी गंभीर दखल घेतली. दरम्यान या घटनेमुळे तिकीट दलालांची दादागिरी समोर आली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

मनसेचा इशारा

कोकण रेल्वेसाठी तिकीट आरक्षणात दलालांची मक्तेदारी असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील (mla raju patil) यांनी केला आहे. या दलालांना धडा शिकवण्याचा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com