Grapes Farming Saam tv
ऍग्रो वन

Grapes Farming : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जुगाड; द्राक्ष बागेचे संरक्षण करण्यासाठी साड्यांचे आच्छादन

Nashik News : ढगाळ वातावरण आणि नंतर पडणारे ऊन यामुळे द्राक्ष मण्यांवर त्याचा परिणाम होत असल्याने सरंक्षण करणे आवश्यक द्राक्ष आता परिपक्व होण्याच्या स्थितीत असल्याने बाग वाचविण्याचा प्रयत्न

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसत आहे. त्यानुसार द्राक्ष बागांना देखील या बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जुगाड करत बागेचे संरक्षण करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. ऊन, पाऊस या पासून सरंक्षण करण्यासाठी साड्यांचे आच्छादन टाकण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. अचानक वाढणारी थंडी तर मध्येच ढगाळ वातावरण आणि नंतर पडणारे ऊन यामुळे द्राक्ष मण्यांवर त्याचा परिणाम होत असल्याने याचे सरंक्षण करणे आवश्यक झाले आहे. द्राक्ष आता परिपक्व होण्याच्या स्थितीत असल्याने बाग वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. 

द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता 

त्यानुसार नाशिकच्या लासलगाव जवळच्या विंचूर येथिल हनुमाननगरच्या शेतकरी महेश जाधव यांनी जुगाड करत द्राक्ष बागांना बदलत्या वातावरणाचा फटका बसू नये; अनोखा जुगाड केला आहे. यात त्यांनी जुन्या साड्यांचे आच्छादन संपुर्ण द्राक्ष बागेवर केले आहे. तीव्र उन्हामुळे द्राक्षमणी तडकण्याची भिती असते. तर हिवाळ्यात अति थंडीमुळे तडे जातात. त्यामुळे बागेचे संरक्षण व्हावे आणि नुकसान कमी व्हावे; या उद्देशाने अशा प्रकारचा जुगाड केल्याच शेतकरी महेश जाधव यांचे म्हणणे आहे.

ड्रोनच्या सहाय्याने कांदा पिकात फवारले तणनाशक
धुळे
: साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांदा पिकात तणनाशक फवारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. साक्री तालुक्यातील शेणपूर येथील प्रगतिशील शेतकरी प्रवीण लक्ष्मण काकुस्ते यांनी कांदा लागवड केली होती. त्यात मजूर टंचाईला कंटाळून कांदा पिकात तन नाशक मारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केली. एकूण तीन एकर क्षेत्र फवारणीसाठी त्यांना पंधराशे रुपये खर्च आला. तर केवळ ५० लिटर पाण्यात तीन एकर क्षेत्रावर फवारणी ड्रोनच्या साह्याने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT