बालाजी सुरवसे
धाराशिव : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगा या गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला असता, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून आज खुलासा करण्यात आला आहे. यामुळे सरपंच हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगा या गावचे सरपंच नामदेव निकम हे २६ डिसेंबरला मध्यरात्री त्यांच्या गाडीने जात होते. यावेळी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला करत दगडांनी काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार सरपंच नामदेव निकम यांनी पोलिसांत दिली होती. दरम्यान पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
तपासानंतर पोलिसांकडून मोठा खुलासा
२६ डिसेंबरला नामदेव निकम यांच्यावर रात्रीच्या दरम्यान व्होनाळा ते मेसाई जवळगा रोडवर मोटारसायवरुन आलेल्या चौघांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. दरम्यान मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमले होते. या प्रकरणात पोलिसांनी पूर्ण तपास करत आज या घटनेबाबत मोठा खुलासा केला आहे. यात नामदेव निकम यांनी बंदुक परवाना मिळवण्यासाठी स्वत:च आपल्या गाडीवर हल्ला करण्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंदुकीच्या लायसन्ससाठी हल्ल्याचा बनाव
बंदुकीचे लायन्स काढण्यासाठी नामदेव निकम यांनी स्वतःच आपल्या गाडीवर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान फिर्यादी सरपंच नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे यांना विश्वास घेवुन पोलिसांनी चौकशी केली असता हल्ल्याचा बनाव केल्याचे निकम यांनी कबुल केल्याची माहिती धाराशिवचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.