Jawhar News : प्रसूतीदरम्यान माता व बाळाचा मृत्यू; जव्हार उपजिल्हा रुग्णालयात आठवडाभरात चौथी घटना

Palghar Jawhar News : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील कूंता पडवळे या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूती करिता जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Jawhar News
Jawhar NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
जव्हार
: पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात गरोदर माता व बाळाचे भविष्य धोक्यात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी पुन्हा एकदा माता व बाळाचे मृत्यू झाला आहे. जव्हारच्या पतंग शहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयात हि घटना घडली असून मागील आठवड्यापासून दोन माता व दोन बाळांचे मृत्यू झाले असून शासन जागे कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील कूंता वैभव पडवळे (वय ३१) या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूती करिता जव्हार उप जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आले होते. तिचा नियमित उपचार विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू होते. मात्र येथे सुविधा नाहीत म्हणून जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. यानंतर महिलेला पुढील उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातेची ही तिसरी प्रसुतीची वेळ होती.

Jawhar News
Narmada Parikrama : भारतीय संस्कृतीने प्रेरित होऊन नर्मदा परिक्रमा; अमेरिकन नौदलाचे निवृत्त अधिकाऱ्याचा रोज ३० किमीचा पायी प्रवास

प्रसूती दरम्यान माता व बाळाचा मृत्यू 

दरम्यान रात्री बारा वाजेच्य दरम्यान कुंटे पडवळे या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. या नंतर तिला रुग्णालयाच्या प्रसूती गृहात दाखल करण्यात आले. यावेळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेले स्त्रीरोगतज्ञ डॉ. आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली. काही वेळातच अचानक महिलेचे हृदय थांबले आणि मातेने तिथेच दम सोडला. दरम्यान बाळाचे ठोके सुरू असल्याने प्रसूती करण्यात आली. मात्र प्रसूती होता होता, बाळाचाही मृत्यू झाला. 

Jawhar News
Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेची बड्या कर्जदारांवर नजर; नऊ संस्थांकडून १३० कोटीची कर्ज वसुली

आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न 

जव्हार उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्यामुळे नेमका माता व बाळाचे मृत्यू जव्हार मोखाडा रूग्णालयात मोठ्या प्रमाणात का होत आहेत. प्रशासन कधी जागे होईल. आठवडाभर दोन माता व दोन बाळाचे मृत्यू झाले असून वर्षेभरात किती मृत्यू झाले असतील? याचा हिशोब ठेवले तर या तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येईल. आरोग्य विभागाचा हा सर्व प्रकार उघड्यावर येवू नये म्हणून हे माता व बाळाचे मृत्यू सर्वतो दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com