Manmad Rain Saam tv
ऍग्रो वन

Manmad Rain : पावसाअभावी मका पिक पडू लागली पिवळी; मनमाड परिसरातील चित्र

Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या पुर्व भागात जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने मनमाड परिसरातील शेतकऱ्यांनी मका लागवड केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : एकीकडे राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत असून राज्यातील काही भागात शेतांमध्ये पाण्याचे तलाव झाले आहेत. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाने ओढ दिली असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे. यात मनमाड परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे मका पीक पिवळे पडू लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या पुर्व भागात जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने मनमाड परिसरातील शेतकऱ्यांनी मका लागवड केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. मक्याची वाढ होत मोठा होण्याच्या अवस्थेत असतांना मोठ्या पावसाची गरज आहे. मात्र सध्या पडणारे ऊन मध्येच ढगाळ वातावरण यामुळे मका कोमेजून पिवळा पडू लागला आहे. राज्यातील अनेक भागात मागील तीन- चार दिवसांपासून (Heavy Rain) जोरदार पाऊस होत आहे. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मनमाड परिसरात पावसाअभावी पिकांचे नुकसान होत आहे. 

मका पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना (Farmer) दमदार पावसाची प्रतिक्षा असून केवळ हलका पाऊस पडत असल्याने कमीत कमी त्यामुळे थोडे फार जीवदान मक्यासह अन्य पिकांना मिळत आहे. मात्र पिकांची चांगली वाढ होण्यासाठी चांगला पाऊस पडल्यास त्यांना खत टाकता येणार आहे. यामुळे मनमाड परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT