Strawberry Farming Saam tv
ऍग्रो वन

Strawberry Farming : सातपुड्यात बहरली स्ट्रॉबेरी शेती; आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविली उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेला डाब, वालंबा हे गावे आता स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहेत. याचे कारणही तसंच आहे. सातपुडा फक्त पावसाळ्यात पीक घेतली जात होती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: महाबळेश्वरमध्ये उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरीची शेती केली जात असते. त्याच दर्जाची स्ट्रॉबेरी पिकविण्याचा यशस्वी प्रयोग सातपुड्यातील आदिवासी बांधवानी केला आहे. सातपुड्यातील आदिवासी बांधव आता आधुनिक शेतीकडे वळले असून थंड हवेत पिकवली जाणारी स्टोबेरी आता सातपुड्यात देखील पिकवली जाऊ लागली आहे. योग्य नियोजन करत येथील शेतकऱ्यांनी सातपुड्यामध्ये स्ट्रॉबेरीची शेती बहरवली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेला डाब, वालंबा हे गावे आता स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहेत. याचे कारणही तसंच आहे. सातपुडा फक्त पावसाळ्यात पीक घेतली जात होती. येथील खडकाळ जमिनीमुळे उत्पन्न मिळत नसल्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगारसाठी स्थलांतरण करावे लागत असल्याचे भीषण वास्तव्य होतं. मात्र आता हि सर्व परिस्थिती बदलली असून येथे चांगल्या प्रकारे शेती केली जात आहे. 

सहलीने शेतकरी झाले प्रेरित 

कृषी विभागाच्या प्रयत्नानंतर येथील आदिवासी बांधवांना महाबळेश्वर येथे पिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची सहल घडवली. त्या सहलीने सातपुड्यातील कित्येक आदिवासी बांधवांना स्ट्रॉबेरीची शेती करण्याची ठरवलं आणि सातपुड्याचा खडकाळ जमिनीत सुद्धा स्ट्रॉबेरीच्या यशस्वी उत्पन्न घेता येऊ शकते हे लक्षात आले. या नंतर तिला आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी पिके घेण्यास सुरुवात केली. 

बांधावर करताय विक्री 

आदिवासी बांधव महाबळेश्वर पेक्षाहीच आकर्षक आणि चविष्ट अशी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करत आहेत. आता गेल्या तीन वर्षांपासून येथील आदिवासी बांधव स्ट्रॉबेरीचा उत्पन्नातून लाखो रुपये कमवत आहे. त्यासोबतच स्टोबेरीच्या यशस्वी लागवटीमुळे येथील आदिवासी बांधवांचा स्थलांतर देखील थांबले आहे. शेतीतून भरघोस उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी हे आपल्या बांधावरच स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT