Shirpur Police : वादग्रस्त पोस्ट व्हायरलप्रकरणी तरुणाला मारहाण करणे पडले महागात; पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Dhule News : अफजल खानाची पोस्ट सोशल मीडियावर संबंधित मारहाण झालेल्या तरुणांनी व्हायरल केली होती. यावर मुस्लिम तरुणांतर्फे या पोस्टला प्रत्युत्तर दिले जात होते. सदरची पोस्ट व्हायरल होत होती
Shirpur Police
Shirpur PoliceSaam tv
Published On

धुळे : राज्यात औरंगजेबाच्या कबरवरून जोरदार वादंग सुरु आहे. याचा धुळ्यातील एका तरुणाने अफजलखानाच्या वधाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत त्यास मारहाण देखील करण्यात आली. मात्र तरुणाला मारहाण करणे या पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट आले असून पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 

अफजल खानाची पोस्ट सोशल मीडियावर संबंधित मारहाण झालेल्या तरुणांनी व्हायरल केली होती. यावर मुस्लिम तरुणांतर्फे या पोस्टला प्रत्युत्तर दिले जात होते. सदरची वादग्रस्त पोस्टबाबत शिरपूर पोलिसांना देखील माहिती झाली. त्या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तरुणाला ताब्यात घेत जबर मारहाण केली. मात्र या मारहाणीच्या प्रकरणानंतर शिव प्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

Shirpur Police
Nilesh Lanke News : औरंगजेब कबर बाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका; खासदार निलेश लंके यांचा सरकारवर निशाणा

शिरपूर पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा 

या प्रकरणानंतर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. तसेच या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर पोलीस ठाण्यावर थेट निषेध मोर्चा नेला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. 

Shirpur Police
Satara Accident : कार अनियंत्रित होऊन बंद कंटेनरवर धडकली; दोन महिलांचा मृत्यू, दोनजण गंभीर

अखेर पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन 

अफजलखान वधाची पोस्ट फेसबुकवर व्हायरल करणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्याला शिरपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मारहाण केल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. तसेच या अधिकाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा देखील दाखल केला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com