सुशील थोरात
अहिल्यानगर : तुम्ही राज्याचे नेतृत्व करता तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता. अनेक ठिकाणी तर पोलीसबळाचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणतो. मग कबर आठवण नाही काय? अशक्य गोष्ट नाही, पण सरकारचा वेळकाढूपणा सुरु आहे. दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहे; असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी लगावला आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी; अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना म्हटल होत की, औरंगजेबाची कबर हटवण्याची सगळ्यांची इच्छा आहे. मात्र त्याला कायदेशीर अडचणी आहेत. काँग्रेसच्या काळातच पुरातत्त्व विभागामार्फत त्या कबरीला संरक्षण देण्यात आलं होतं. याबाबत बोलताना खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देत कबरीबाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका सुरू असल्याचे म्हटले आहे.
सत्यता पडताळून दोषींवर कारवाई करावी
संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी करावे अशी मागणी होत आहे. यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, सत्यता काय आहे ते पडताळून घ्यावी. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही. मात्र सत्याला पडताळून जर त्यात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले.
वारंवार अत्याचाराच्या घटना हे सरकारचे अपयश
बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यात रक्षकच भक्षक झाल्याची घटना घडली. महिला दिनाच्या दिवशीच पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदाराने एका महिलेवर बलात्कार केला. याबाबत बोलताना खासदार निलेश लंके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. चुकीच्या पद्धतीने राज्यात आलेल्या या सरकारचा गृह विभागावर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाही. ज्या पोलिसांकडे आपण रक्षक म्हणून पाहत असतो ते जर भक्षक झाले; तर हे निंदनीय गोष्ट असल्याचे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. वारंवार राज्यात अशा घटना घडत आहेत, हे या सरकारचं अपयश असल्याचं खासदार निलेश लंके म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.