Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop: लाल्या रोगामुळे कापसाच्या उत्पादनात घट; दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे संकट

Nandurbar News : लाल्या रोगामुळे कापसाच्या उत्पादनात घट; दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे संकट

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट कायम उभे आहे. गेल्यावर्षी कापसाला चांगला दर न मिळाल्याने कापूस (Cotton) घरातच ठेवावा लागला. भाव वाढीच्या अपेक्षा मावळल्याने कमी दारात कापूस विक्री करावा लागला. यंदा पावसाच्या (Nandurbar) लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती असून कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. (Tajya Batmya)

राज्यातील सर्वात मोठा कॉटन बेल्ट म्हणून उत्तर महाराष्ट्राकडे पाहिले जात असते. यावर्षी एकट्या नंदुरबार जिल्ह्यात एक लाख २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र पावसाचा मोठा खंड आणि कापसावर आलेल्या लाल्या रोगामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आले आहे. शेतकऱ्यांच्या कापूस वेचणीला सुरुवात झाली असून बाजारपेठेत कापसाला समाधानकारक (Cotton Price) भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. लाल्या रोग आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे उत्पादनात घट तर दुसरीकडे बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची स्थिती दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.

नंदुरबार, धुळे, जळगाव या तिन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे लागवड केली जात असते. मात्र यावर्षी या तिन्ही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यातच कापसावर आलेल्या लाल्या रोग आणि पावसाच्या मोठ्या खंडामुळे कापसाच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. नंदुरबार जिल्ह्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही; अशी स्थिती आहे. कापसाच्या दरासंदर्भात सरकारने योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

PSI बदने सापडला, मोबाईल मात्र गायब, बदनेच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचं गूढ?

SCROLL FOR NEXT