Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar News: तीनसमाळ घाटात कोसळली दरड; चार गावांच्या नागरिकांची पायपीट

Nandurbar News : तीनसमाळ घाटात कोसळली दरड; चार गावांच्या नागरिकांची पायपीट
Published on

सागर निकवाडे 

नंदूरबार : सातपुडा भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील तिनसमाळ घाटात दरड कोसळली आहे. यामुळे (Nandurbar) वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. या रस्त्याची दुरवस्था नेहमीच बिकट असते. यात आता दरड कोसळल्याने चार गावांच्या दळणवळणाचा मार्ग बंद झाला असून नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
DJ Laser Light: विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यांवर घातक परिणाम; डीजेच्या लेझर लाईटने दृष्टी झाली कमी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील तिनसमाळचा रस्त्याचे काम चांगले न केल्याने ही अवस्था आहे. मागील काही दिवसांपासून गावात जाणार रस्ता बंद असल्यामुळे नागरिक पायपीट करीत आहेत. ठीक ठिकाणी दरडी कोसळून रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. गावात जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता तुटल्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तिनसमाळ, बेडीपाडा, सापऱ्यापाडा आणि शेलदा अशा चार गावांना जोडणारा रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. 

Nandurbar News
Shirdi News: पोलीस ठाण्याच्या आवारातील बसमध्ये एकाने घेतला गळफास: शिर्डी येथील प्रकार

मोटारसायकलही जाणे अशक्य 

गावात जेमतेम जीप जाणाऱ्या रस्त्याला शासनाने लक्ष न दिल्यामुळे आता मोटर सायकलही जाणे कठीण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  दहा कोटी खर्च करून देखील मोटर सायकल जात नसेल तर एवढा पैसा कोठे खर्च केला असा सवाल नेमही गावकरी प्रशासनाकडे विचारत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com