म्हसदी (नंदुरबार) : यंदा मार्चपासून पारा चाळीशीपुढे होता. जून उजाडला तरी उन्हाचे चटके काही कमी होत नसल्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतशिवारात चक्राकार पद्धतीने भारनियमन (Load Shedding) सुरू आहे. रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा देऊन शेत शिवारात दिवसभर ‘बत्ती’ गुल असते. रात्री वीज पुरवठा केला जातो. यामुळे भाजीपाला आणि फळे बागायतदार शेतकऱ्यांची (Farmer) मोठी अडचण होत आहे. (nandurbar news mahavitaran change Load shedding time)
पिकांना ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा देताना अंधारात चाचपडत काम करावे लागते. शासनाचे धोरण,वितरण (Nandurbar News) कंपनीचे नियम अथवा विजेच्या (MSEDCL) तुटवड्यामुळे भारनियमन केले जात असले तरी शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळा पाहून तरी भारनियमन करावे अशी अपेक्षा बळिराजा करत आहे. वेळेत बदल करत रात्री उशिरा सुरू झालेला वीज पुरवठा सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवावा अशी मागणी केली जात आहे. गेल्या वर्षी दमदार पावसामुळे जलस्तराची पातळी टिकून आहे. भारनियमनाचे चक्र त्या-त्या भागात भिन्न-भिन्न असले तरी भाजीपाला, फळ बागायतदार शेतकऱ्यांसह अन्य शेतकरीही हतबल झाला आहे.
रात्रीच्या भारनियमनात बदल करावा
म्हसदीसह ककाणी, भडगाव, राजबाई, शेवाळी, काळगाव आदी ठिकाणी शेतकरी भाजीपाल्यात शेवगा, फळ पिकात सीताफळ, डाळिंब, टरबूज, खरबूज, डांगर यासारखी पिके घेतो. सध्या शेवगा, डाळिंब सारख्या पिकांना ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते व इतर तत्सम पोषक घटक दिले जातात. तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीत कमालीचा बदल झाल्याने सध्या शेती परवडत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी भारनियमनामुळे रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा असला तरी योग्य मात्रा देताना अंधारात चाचपडत काम करावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांना अवघ्या दोन तासात ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. कंपनीने सुरू केलेले वेळापत्रक चुकीचे असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.