Nandurbar: पोटनिवडणूक निकाल अपडेट; महाविकास आघाडीची सरशी

पोट निवडणूक निकाल अपडेट; महाविकास आघाडीची सरशी
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी गटासाठी झालेल्‍या पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निकालात महाविकास आघाडीची सरशी राहिली असून महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुनील सुरेश गावित विजयी झाले आहेत. (Nandurbar news By election results update Mahavikas Aghadi candidate victory)

Nandurbar News
धोकादायक वळणावर अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील असली ग्रामपंचायतीच्या दोन गणांसाठी व नवापुर (Navapur) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्‍या चितवी गटाच्‍या पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. यानंतर आज मतमोजणीची प्रक्रीया पार पडत आहे. यात चितवी गटात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील सुरेश गावित व अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांच्यामध्ये सरळ लढत होती. यात राष्‍ट्रवादीचे सुनील गावित यांनी अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांना पराभुत करत विजय प्राप्‍त केला.

असली गणात कॉंग्रेस

चितवी जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार सुनील सुरेश गावित यांचे वडील या गटाचे सदस्य होते. परंतु त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सदस्य पद रिक्त झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. अखेर सुनील सुरेश गावित यांनी 2 हजार 319 मतांनी विजयश्री खेचून आणला आहे. तर दुसरीकडे धडगाव पंचायत समितीतील असली गणात पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार सोनिया सिफा वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी झाले आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात महा विकास आघाडीने पोटनिवडणुकीत सरशी मिळवली आहे.

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे, नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, आदी अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक व मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी चोख भूमिका बजावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com