धोकादायक वळणावर अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

धोकादायक वळणावर अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Accident
AccidentSaam tv

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात (Accident) तिघे मित्र ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (sangli news Accidents on dangerous turns Three killed)

Accident
मोठी बातमी! सिद्धू मुसेवालाला मारणारे दोन शूटर्स पुण्यातले; फोटोवरून पटली ओळख

विजयपुर गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ (Sangli News) ओढ्याजवळ घटना घडली आहे. या अपघातात अजित नेताजी भोसले (वय २२), मोहित शिवाजी तोरवे (वय २१), राजेंद्र भाले (वय २२) हे तिघे ठार (Death) झाले आहे. तर संग्राम विक्रम तोरवे (वय १६) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालय (Hospital) येथे उपचार सुरू आहेत. कोसारी येथे पहाटे साडेपाच वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कोसारी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धोकादायक वळणावर सुटला ताबा

कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते. हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते. दरम्यान, बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. एकाच मोटरसायकलवर चौघे जण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. घटनेचे गांभीर्य ओळखत मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. मात्र गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोरवे, राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com