Rabi Crops Saam tv
ऍग्रो वन

Rabi Crops : रब्बी हंगामातील पीक काढणीला सुरुवात; दराबाबत मात्र चिंता

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्णतः वाया गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर लागल्या होत्या.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात (Rabi Crops) रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका, ज्वारी, भुईमूग अशा पिकांची लागवड (Nandurbar) करण्यात आली होती. त्यामुळे हे पिकं काढायला सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्णतः वाया गेला होता. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर लागल्या होत्या. मात्र हवामानाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी आता पीक जगवली असून काढणीला आले आहेत. मात्र (Wheat) गहू, हरभरा, मका या पिकांना चांगला भाव मिळणार का? हे आता शेतकऱ्यांसमोर आव्हान राहणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळीची शक्यता 

वातावरणात बदल झालेला पाहण्यास मिळत असून हवामान खात्याकडून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे काढणीला आलेले पीक काढून घेण्यावर शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. शेतातून माल काढून घरात नेण्याची धावपळ शेतकऱ्यांची सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

SCROLL FOR NEXT