Bjp Mp Heena gavit
Bjp Mp Heena gavitSaam Tv

Nandurbar Politics: मी पुन्हा येईन! हिना गावित यांना विश्वास; सांगितलं परत उमेदवारी मिळण्यामागील 'लॉजिक'

Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने निवडणुकांची तयारी सुरू झालीय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीचे वारे जोरदार वाहण्यास सुरुवात झालीय. नंदुरबार लोकसभेसाठी भाजपमध्ये ही उमेदवारीसाठी अनेक राजकीय नेते इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर हिना गावित यांनी आपल्या उमेदवारीविषयी सुतोवाच केले आहे.
Published on

Nandurbar Politics Bjp Mp Heena Gavit:

मतदारसंघात केलेल्या कामांमुळे आपल्यालाच लोकसभेची उमेदवारी मिळेल असा दावा खासदार हिना गावित यांनी केलाय. गेल्या दहा वर्षात आपण अनेक विकासकामे केले आहेत. केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतलीय. पक्षश्रेष्ठीकडून माझ्या कामाचा नेहमीच गौरव केला गेलाय त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास हिना गावित यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलाय. (Latest News)

देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok sabha Election) वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने निवडणुकांची तयारी सुरू झालीय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीचे वारे जोरदार वाहण्यास सुरुवात झालीय. नंदुरबार लोकसभेसाठी भाजपमध्ये ही उमेदवारीसाठी अनेक राजकीय नेते इच्छुक आहेत. निवडणूक (Election) आली की अनेक इच्छुक तयार होत असतात. मात्र पक्षश्रेष्ठी मतदारसंघात (Constituency) केलेली विकासकामे आणि संसदेत केलेल्या कामाचा आढावा घेतात त्यासोबत पक्षाच्या हितासाठी आणि पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांची मोजमाप करुन उमेदवारी देत असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात आपण अनेक विकास काम केले असून केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतलीय. पक्षश्रेष्ठीकडून माझ्या कामांचा नेहमीच गौरव केलाय. गेल्या १० वर्षात केलेल्या कामांमुळे पुन्हा उमेदवारी मलाच मिळेल असा आत्मविश्वास खासदार डॉ. हिना गावित यांनी बोलतांना व्यक्त केला.

भाजपमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना नेहमीच संधी दिली जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भागाच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होती. त्यातूनच या भागात अनेक विकासकामे झाली आहेत. त्यामुळे उमेदवारी आपल्याला मिळणार आहे, मात्र निवडणूक आली की अनेक इच्छुक तयार होत असतात. हे फक्त भाजपात नाही तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे. इच्छुक उमेदवार निवडणूक आल्यावर तयार होतात, मात्र योग्यच उमेदवाराला पक्षाकडून संधी दिली जात असते. मी केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा संधी मिळेल, असा आत्मविश्वास खासदार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केलाय.

Bjp Mp Heena gavit
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, काँग्रेस 17 जागांवर लढणार निवडणूक; सपा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com