Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; दुष्काळी संकटात वीज तारांची चोरी, वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतीवर परिणाम

Nandurbar News : शेतकरी संपप्त झाले असून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाची तयारी देखील सुरु केली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे असताना आता तार चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. थेट खाबावरच्या ताराच चोरीला जात असल्याने शेतीचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम  शेतीवर होत आहे. 

दुष्काळाने शेतकरी (farmer) अगोदरच संकटात सापडला आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावल्याने पिकांना पुरेसे पाणी देता येणे शक्य होत नाही. त्यात आता विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच प्रकाशा येथील सबस्टेशनवरुन सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने या परिसरातील शेतकरी संपप्त झाले असून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाची तयारी देखील सुरु केली आहे. 

शेती पंपासाठी विद्युत पुरवठा (Nandurbar) मिळत नाही. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. ऊस, कापूस, पपई या पिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज असताना शेती पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी मिळत नाही. म्हणून पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून येत्या दोन दिवसात कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल; असे लेखी निवेदन प्रकाशा शेतकरीनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT