Sambhajinagar Drought : विकतचे पाणी परवडेना; अनेकांनी फळबागावर फिरवला बुलडोझर, मोसंबी फळबाग शेतकरी अडचणीत

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून चांगले उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे
Sambhajinagar Drought
Sambhajinagar DroughtSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. भूजल पातळी देखील खालावली असल्याने विहिरी, बोअरवेलच्या पाणी नाही. यामुळे शेतातील फळबागा जगवायची कशा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विकतचे पाणी घेऊन देणे परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळबागांवर बुलडोजर फिरविला आहे. 

Sambhajinagar Drought
ATM Crime : बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलले; फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठण तालुका मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून चांगले उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १६ हजार हेक्टर मोसंबीची लागवड आहे. त्यापैकी एकट्या पैठण तालुक्यामध्ये ८ हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड आहे. यंदा भीषण दुष्काळ असल्याने गेली अनेक वर्षे तळहाताप्रमाणे जपलेल्या मोसंबी बागा वाळु लागली आहे. भीषण दुष्काळात बाग जगू शकत नाही. तर विकत घेऊन टँकरने पाणी परवडणारे नसल्याने अनेक (farmer) शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आपल्या फळबागावर बुलडोझर फिरविण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

Sambhajinagar Drought
Shrirampur Bribe Case : १२ हजारांची लाच घेतांना पोलीस हेडकॉन्स्टेबल ताब्यात; गुन्ह्यात नाव येऊ न देण्यासाठी मागितली लाच

अनेक जण अजूनही विकतचे पाणी घेऊन बाग जगवित आहेत. मात्र मान्सून (Rain) लवकर बरसला नाही; तर शेकडो हेक्टरवरील फळबाग नष्ट होतील. शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या कष्टाने मोसंबी लावली. मेहनत करुन मोसंबीची रोपे वाढवली. यंदा मात्र पाणी टंचाईने डोके वर काढले पाण्याअभावी सर्व बाग वाळुन गेला. फळबागातून सुधारणा होईल आशेने त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्याने मोसंबीच्या बागा लावला. उधार -उसृनवारी करुन यासाठी त्यांनी भांडवल उभार केले. सहा वर्ष मेहनत घेतल्यानंतर या झाडांना फळे लागली आणी यांचे स्वप्न वास्तवात आले. नेमक त्याच वेळी दुष्काळाने डोके वर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com