Nandurbar News Cotton Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: टोचन यंत्राच्या साह्याने कापूस लागवड; मान्सून पूर्व कापूस लागवडीला सुरुवात

टोचन यंत्राच्या साह्याने कापूस लागवड; मान्सून पूर्व कापूस लागवडीला सुरुवात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात बागायतदार शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व कापूस लागवडीची लागवड सुरू झाली असली तरी मजुरांच्या कमतरतेमुळे (Cotton) कापूस लागवडीवर परिणाम होत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी (Farmer) टोचन मशीनद्वारा कापूस लागवडीला प्राधान्य दिले असून एका मजुराच्या साह्याने दिवसभरात पाच एकर कापसाचे लागवड करता येत असते. यामुळे मजुरीचा खर्च तसेच बियाण्याचाही खर्च वाचण्यास मदत होत आहे. जमिनीत योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर लागवड होत (Nandurbar) असल्याने उगवण क्षमता ही चांगले असल्याचे दिसून आले आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी एक लाख ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीची शक्यता आहे. मात्र मजूर त्यांच्यामुळे कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. शेतकऱ्यांनी मार्ग काढत कृषी विज्ञान केंद्राचा मार्गदर्शनाखाली हरभरा आणि मका लागवडीसाठी असलेल्या टोचन यंत्राचा साह्याने कापूस लागवड सुरू केली असून यातून कमी बियाण्यात आणि समान अंतरावर कापसाची लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाई दिलासा मिळाला आहे. या मशीनच्या सहाय्याने कापूस लागवड केल्यास मजुरीच्या पैशात आणि बियाण्याच्या पैशातही बचत होत असल्याचे शेतकरी सांगतात.

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कापूस लागवडीचे प्रात्यक्षिक केल्यानंतर या मशीनद्वारे कापूस लागवडीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांनी या मशीनचा उपयोग केला असून यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही वेळेत कापसाची लागवड पूर्ण होत असल्याने ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारात विविध कंपनीद्वारा मका आणि हरभरा लागवडीसाठी हे मशीन उपलब्ध होते. मात्र आता त्याचा वापर कापूस लागवडीसाठी देखील होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media: फेसबुक, इन्स्टाग्राम की एक्स; सर्वाधिक कमाई कुठून होते? वाचा सविस्तर

Sprouted Potatoes Risk : मोड आलेले बटाटे खाताय? आरोग्याला निर्माण होईल मोठा धोका, तज्ज्ञांचा इशारा

Maharashtra Live News Update : नगर- मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन

Param Sundari vs Baaghi 4 : 'परम सुंदरी' की 'बागी 4' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? टायगर श्रॉफच्या चित्रपटाने 5व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

SCROLL FOR NEXT