चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एका वैध वाळूघाट चालकाला सामाजिक कार्यकर्ता असलेल्या (Chandrapur) पीएचडी प्राप्त व्यक्तीने धमकावत पैशाची मागणी केली. परंतु या मागणीला भीक न घालता त्याने थेट पोलिसात धाव घेत त्याचे बिंग फोडले. (Live Marathi News)
चंद्रपूर जिल्ह्यातील २९ वर्षीय शुभम चांभारे मागील ४ ते ५ वर्षांपासून वाळूचा अधिकृत व्यवसाय करीत आहेत. परंतु त्याला लुटण्याचा प्रयत्न एका पीएचड प्राप्त डॉक्टरने सुरू केला. सतत काही ना काही कारणावरून बड्या अधिकाऱ्यांची धमकी देत तो वारंवार फोन करत असे. भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिठ भद्रावती येथील वाळू घाटावर जात फोटो काढत धमकवण्याचे प्रकार सुरू केले होते. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वाळू चालकाने पोलिसांकडे मदत मागितली.
डॉ. दाते हा महिन्याभरापासून चांभारे यांच्या वाळू घाटावर जात त्यांना पैश्यासाठी त्रास देत होता. अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याचे सांगून वाळूवरील कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतील अशी बतावणी करत होता. या सर्व प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस (Police) स्टेशनमध्ये करण्यात आली. वरोरा पोलिसांनी कलम ३८५ अन्वये डॉ. नरेंद्र दाते याच्यावर गुन्हा दाखल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.