Farmer Success Story
Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : चवळी लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; बिलोली येथील शेतकऱ्याचे योग्य नियोजन

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने काही तरी वेगळे करायचे या उद्देशाने शेतात चवळी पिकाची लागवड केली. योग्य नियोजन व मेहनतीमुळे उत्पादन चांगले आहे. शिवाय बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्याला चवळी लागवडीतून चांगला फायदा देखील झाला आहे.

यंदा राज्यात दुष्काळाचे (Drought) सावट आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवली असल्याने अनेक ठिकाणी शेतात लागवड केलेले पीक देखील करपून जात आहेत. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. परंतु बिलोली येथील शेतकरी माधव कुरमुरे या शेतकऱ्याने आपल्या २५ गुंठे शेतीत चवळीची लागवड केली. बाजारात चळवळीला मोठी मागणी आहे. या चवळी लागवडीतून माधव कुरमुरे यांना चांगले उत्पन्न मिळाले.

नांदेडच्या (Nanded) बिलोली तालुक्यातील अनेक शेतकरी भाजी पाला शेतीकडे वळले आहेत.भाजी पाला शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग माधव कुरमुरे यांनी करत शेतात उन्हाळी चवळीची लागवड केली. यात त्यांना बाजारात चांगला भाव मिळत असल्याने चांगला फायदा देखील यातून होत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev : सायली संजीवचा परदेश दौरा...

Worli Hit And Run Case: अपघातपूर्वीचे CCTV फुटेज आले समोर, कारमधून उतरताना दिसला मिहीर शहा

VIDEO: Pandharpur विठ्ठल मंदिरामध्ये VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय

Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरेंसोबतची युती आता होणार नाही', प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

VIDEO: Uddhav Thackeray यांनी रडणं सोडावं, ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शिंदेंचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT