Parbhani News : कापसाला भाववाढीचा फायदा मिळेल या आशाने तब्बल नऊ महिने राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी जुलैअखेरपर्यंत कापसाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात लिलावाद्वारे विक्री केली. या हंगामात शेतकऱ्यांना भाववाढीची आशा होती. मात्र, हंगाम संपतानासुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षित भाववाढ मिळाली नाही. या हांगामात एकूण चार लाख सात हजार क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. (Maharashtra News)
शहरातील (parbhani) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीला 14 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. सुरुवातीला सरासरी दर 9 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दर मिळून देखील शेतकरी विक्रीस उत्साही नव्हते.
22 ते 28 डिसेंबरदरम्यान कापसाचे सरासरी दर 8600 ते 8 हजार 800 वर आले होते. कापूस आत आले होते. राखून ठेवलेला शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, पुन्हा 31 डिसेंबरपासून कापसाच्या दरात उभारी आल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. 7800 वर गेलेले दर पुन्हा 8900वर गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
21 एप्रिल ते 30 एप्रिलदरम्यान भाव आठ हजारांच्या दरम्यान सरासरी 7900 रुपयांपर्यंत भाव गेले होते. मे महिन्यात दर सात हजारांच्या आत आले होते. जून महिन्यात हा दर कायम होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 7300 रुपये दर मिळाला.
मात्र, दुसऱ्या आठवड्यात कापसाचा दर 700 प्रतिक्विंटल वर आला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात साडेसात रुपये दर मिळाला. मात्र, या कापूस हंगामात भाववाढीचा फायदा मिळेल या आशाने घरात राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.