Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price: सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर; शेतकऱ्यांनी केली सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरच सरकारची महाआरती

Latur News : सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर; शेतकऱ्यांनी केली सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरच सरकारची महाआरती

Rajesh Sonwane

संदिप भोसले
लातूर
: सोयाबीनला यंदा पावसाचा फटका बसला आहे. शिवाय रोग पडल्यामुळे उत्पादनातही घाट झाली आहे. यात  सोयाबीनला (Soyabean Price) शासनाचा हमीभाव ४ हजार ६०० रूपये भाव आहे. मात्र प्रत्यक्षात ४ हजार २०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी (Farmer) हताश झाला आहे. (Live Marathi News)

सोयाबीनचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या लातूर (Latur) जिल्ह्यात यंदा सोयाबीन उत्पादनात ४० टक्यांपर्यंत घट येत आहे. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने इथला शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तर शासनाच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला तुटकुंजा भाव मिळतो आहे.  

सरकारची केली महाआरती 

यंदा सुरुवातीपासूनच लातूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे इथल्या शेती पिकामध्ये ५० टक्केपर्यंत उत्पादनात घट येत आहे. साधा लागवड खर्चही निघत नसल्याने इथला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. लातूरच्या पानचिंचोली इथल्या संतप्त शेतकऱ्यांनी चक्क शेतात सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरच सरकारची महाआरती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT