जळगाव : घराला लावलेले वीजमीटर नादुरुस्त असल्याने ते काढून नवीन मीटर बसविण्यासाठी महावितरणच्या (Jalgaon) ग्राहकाने तक्रार दिली होती. मीटर बदलवून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Tajya Batmya)
जळगाव शहरातील आदर्शनगर परिसरातील कार्यालयात कार्यरत वायरमन संतोष भागवत प्रजापती असे लाचखोर वायरमनचे नाव आहे. तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरणचे वीजमीटर आहे. त्यांचे जुनेमीटर नादुरूस्त असल्याने नवीन वीजमीटर बसविण्यासाठी तक्रारदार यांनी श्री. प्रजापती यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मीटर बदलवून देण्याच्या मागणीसाठी प्रजापती याने तक्रारदाराला २५ हजार रुपयाच्या (Bribe) लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. तक्रारीची उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी खातर जमा करत सापळा रचत श्री. प्रजापती यांना तक्रारदारकडून २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडत अटक केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.