Jalna News Babanrao Lonikar
Jalna News Babanrao LonikarSaam tv

Jalna News: सभा होण्यापूर्वीच आमदार लोणीकरांचा काढता पाय; आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक

Jalna News : सभा होण्यापूर्वीच आमदार लोणीकरांचा काढता पाय; आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक
Published on

जालना : जालन्यात आज माजी पाणीपुरवठा मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या भाजपच्यावतीने (Ashti) आष्टी आणि सातोना या ठिकाणी दोन सभेचे आयोजन करण्यात आलं होते. मात्र आमदार बबनराव लोणीकर यांनी (Jalna News) मराठा समाजाच्या आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट न केल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजाकडून त्यांच्या सभा उधळून लावण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Jalna News Babanrao Lonikar
Dhule News: कापूस व तुर पिकाच्या आडून गांज्याची शेती; पोलिसांनी कारवाई करत केली उध्वस्त

जालना जिल्ह्यात यापूर्वी आमदार नारायण कुचे यांना रोहिला गड आणि वजीरखेडा या गावात मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागले होते. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मागणीवर मराठा समाजाकडून आक्रमक भूमिका घेत माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दोन्ही सभा उधळून लावण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नेत्यांना आणि पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्याचाच फटका आता सत्तेत असलेल्या आमदारांना बसताना दिसत आहे. 

Jalna News Babanrao Lonikar
Bribe Trap: मीटर बदलून देण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या ताब्यात

लोणीकरांचा काढता पाय 

परतुर तालुक्यातील आष्टी आणि सातोना या ठिकाणी मराठा कार्यकर्त्याच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत लोणीकर यांच्या सभेला विरोध करण्यात आला. यावेळी बबनराव लोणीकर यांनी तात्काळ या सभा रद्द करत सभेच्या ठिकाणा बाहेरून काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक आमदारांकडून आता आपले कार्यक्रम रद्द केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com