lasalgaon krushi utpanna bazar samiti will remain closed till 4 april  saam tv
ऍग्रो वन

Nashik : कांदा उत्पादक शेतक-यांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून लासलगाव बाजार समिती सहा दिवस बंद राहणार

lasalgaon krushi utpanna bazar samiti : लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहणार असल्याचे लासलगाव बाजार समिती प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी लासलगाव बाजार समिती आजपासून (शनिवार, ता. 30 मार्च) 4 एप्रिलपर्यंत असे सहा दिवस बंद राहणार आहे. शेतक-यांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन लासलगाव बाजार समितीने केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज (शनिवार) रंगपंचमी आहे. तसेच सलग पुढच्या दोन दिवस आलेल्या सुट्ट्या व मार्च एन्डच्या कामा निमित्ताने व्यापा-यांच्या वर्ष अखेरच्या कामा निमित्त बाजार समिती बंद राहणार आहे.

या बाजार समिती मधील व्यापारी असाेसिएशऩने बाजार समिती प्रशासनाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने बाजार समिती मधील कांदा लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT