रणजित माजगावकर
कोल्हापूर : करवीर तालुक्यात खुपिरे येथे बोगस रासायनिक खतांचा साठा आढळून आल्याने कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात रब्बी, उन्हाळी आणि उसाच्या भरणीचा हंगाम सुरू असताना बोगस खतांचा सुळसुळाट सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कृषी विभागाने कारवाई करत दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.
कृषी विभागाची खत तपासणी मोहीम या परिसरात सुरू होती. या तपासणीत अचानक रंगभैरव शेती सेवा केंद्रामध्ये सकाळी अधिकारी आले असता खताच्या बॅगांची तपासणी करत असताना पॅरादीप फॉस्फेट या खताच्या बॅगमध्ये १०:२६:२६ चे दुसरे खत भरले असल्याचा संशय आला. बॅगा तपासणी करत असताना प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे लक्षात आले. १०:२६:२६ या खताच्या बॅगचा दर १ हजार ७२० रुपये आहे. तर बॅग वर एमआरपी १ हजार ६५० रुपये असल्याने शंका बळावली. यामुळे कसून चौकशी केली असता बोगस व दुसऱ्याच कंपनीचे खत या बॅगमध्ये भरल्याचे अधिकाऱ्यांचे निदर्शनास आले.
दुकानदारावर तीन गुन्हे दाखल
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील खुपिरे येथे रंकभैरवी या कृषी दुकानात दुकानात १०:२६:२६ (एनपीके) या रासायनिक खताच्या ७७ बोगस बॅग आढळून आल्या आहेत. या प्रकरणी कृषी दुकानदार आकाश गणपती नाळे यांचेवर करवीर पोलिसात अत्यावश्यक सेवा कायदा, खत नियंत्रण कायदा व रासायनिक खते कायदा असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
एक लाखांची बोगस खते जप्त
दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी बॅगांची विक्री बंद आदेश देऊन खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच ७७ बॅग ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आल्या आहेत. या बॅगची रक्कम एक लाख २७ हजार रुपये आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी करवीर पोलिसांमध्ये दुकानदाराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर करवीर पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन बोगस खतांच्या बॅगचा पंचनामा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.