snail, farmer saam tv
ऍग्रो वन

How can snails be controlled ? शेतकरी मित्रांनो ! गोगलगायपासून सावधान, वाचा कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सल्ला

गोगलगाय गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे.

Siddharth Latkar

- संदीप भोसले

Latur News : जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा गोगलगायद्वारे अंडी टाकण्याचा राहणार असल्यामुळे जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा गोगलगायच्या प्रभावी नियंत्रणासाठी निर्णायक राहणार आहे. त्यामुळे पहिल्या पंधरवाडयातच सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरूपात गोगलगायचे एकात्मिक व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषि विभाग व कृषि विद्यापीठाने केले आहे. (Maharashtra News)

प्रा.अरुण गुट्टे (विस्तार कृषि विद्यावेत्ता, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर) म्हणाले सर्वसाधारण गोगलगाय ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जमिनीखाली सुप्तावस्थेत जातात आणि जून महिन्यात चांगला पाऊस (rain) होताच त्या सुप्तावस्थेतून बाहेर येऊन जमिनीच्यावर येतात. मागीलवर्षी सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगाय चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसानंतर सुप्तावस्था संपवून जमिनीच्या वर आलेल्या आहेत.

सध्या मागीलवर्षी गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे दुबार पेरणी कराव्या लागलेल्या क्षेत्रामध्ये गोगलगायचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. सुप्तावस्था संपवून जमिनीवर आलेल्या गोगलगायचा पहिल्या पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायशी संग करून पंधरा दिवसानंतर जमिनीच्याखाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकणार आहे.

या अंडयाद्वारे गोगलगाय पुढील वर्षाची पिढी तयार होणार आहे. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायचे नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

गोगलगायचे व्यवस्थापन कसे करावे

गोगलगाय सोयाबीन पिकाचे रोपावस्थेत मोठया प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे रोपावस्थापूर्वीच गोगलगायचे नियंत्रण करणे आवशयक आहे. सध्या सुप्तावस्थेतून बाहेर आलेल्या गोगलगाय दररोज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान शेतात (farm) जाऊन जमिनीच्या वर आलेल्या गोगलगाय गोळा कराव्यात.

गोळा केलेल्या गोगलगाय कुठेही न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात किंवा गोळा केलेल्या गोगलगायवर मिठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी. त्यासोबतच सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रॅन्डम पद्धतीने टाकावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगाय गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

याशिवाय स्नेलकिलच्या छोटया छोटया गोळया बांधाच्या बाजूने 5 ते 7 फुट अंतरावर टाकून द्याव्यात किंवा गोगलगायचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास स्नेलकिल गोळ्याचे पावडर तयार करून पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करावी आणि अशी पेस्ट मूरमुऱ्याला लावावी व असे मुरमुरे गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर टाकावेत.

स्नेलकिल हे औषध गोगलगायला आकर्षून घेते आणि या स्नेलकिल गोळीला किंवा स्नेलकिलयुक्त मूरमुऱ्याला खाल्यानंतर 4 ते 5 तासात गोगलगायच्या शरीरातील स्त्राव बाहेर पडून गोगलगाय (Snail) नष्ट होतात. गोगलगाय गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

SCROLL FOR NEXT