Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल

Jalgaon News : सावकाराकडून घेतलेल्या रक्कमेमुळे कर्ज वाढले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत दशरथ तांदळे होते

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मागील आठवड्यात दोन शेतकरी आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने जीवन संपविले आहे. डोक्यावर असलेल्या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील दापोरा दशरथ भिमराव तांदळे (वय ५४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दापोरा गावात दशरथ तांदळे हे पत्नी, मुलगा, मुलीसह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. (Farmer) तसेच खासगी सावकाराकडून घेतलेल्या रक्कमेमुळे कर्ज वाढले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत दशरथ तांदळे होते. 

कर्ज फेडता येत नसल्याच्या विवंचनेत दशरथ तांदळे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना समजतात त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांनी आक्रोश केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील आठवडाभरात चौथी शेतकरी आत्महत्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT