Saam Tv
एरंडेल तेल आणि नारळाचे तेल केसांना मूळापासून मजबूत करण्याचे काम करतात. तेलाचे मिश्रण गरम करून ३ दिवस केसांना लावून मालिश केल्याने हळूहळू केस सरळ व्हायला मदत होते.
अंड्यामुळे केसांना सिल्कीपणा मिळतो. त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून फेटून लावा. नंतर शॅम्पू लावून केस धुवून घ्या. त्यामुळे केस सिल्की होतील आणि कुरळेपणा कमी होईल.
केस अर्धवट सुकल्यानंतर हीट प्रोटेक्टंट लावा आणि राऊंड किंवा पॅडल ब्रशच्या मदतीने ब्लो ड्राय करा. यामुळे केस अधिक सरळ दिसतात.
केस धुतल्यानंतर सुकत असताना मोठ्या दातांचा कंगवा वापरून सतत विंचरत राहावे. असे दररोज केल्याने केस हळूहळू सरळ होऊ लागतील.
स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंगसाठी तयार केलेले शॅम्पू आणि कंडीशनर वापरल्याने केस अधिक मऊ आणि फ्रिझीपणा कमी होतो.
केस धुतल्यानंतर अँटी- सीरम वापरल्याने कुरळेपणा कमी होतो. केस अधिक स्मूथ होतात.
केस आनुवांशिकरित्या कुरळे असतात. त्यामुळे केस कायमचे पुर्णपणे सरळ होतील अशी शक्यता कमी असते पण तुम्ही प्रयत्न करूच शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.