Farmer Death Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike: अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू; मुंबईला सुरू होते उपचार

अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू; मुंबईला सुरू होते उपचार

साम टिव्ही ब्युरो

कळमसरे (जळगाव) : पिंपळकोठे (ता. पारोळा) 9 सप्‍टेंबरला सायंकाळी झालेल्या वादळी पावसात (Rain) येथील बापु डीगंबर शिरसाठ (वय 44) हे पाऊस सुरु झाल्याने शेतातून सायकलीवर येत होते. या दरम्‍यान अंगावर वीज (Lightning Strike) पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांचावर उपचार सुरू असताना आज (20 सप्‍टेंबर) सकाळी मुंबई (Mumbai) येथे मृत्यू झाला. (Jalgaon News Farmer Death)

बापु शिरसाठ (Farmer) हे आपल्या शेतात कापूस पिकाला फवारणी करायला गेले होते. सायंकाळच्‍या सुमारास अचानक पाऊस, वादळ व विजाचा कडकडाट सुरु झाल्याने ते गावाकडे येऊ लागले. ते सायकलीवर येत असताना अगदी गावाजवळच त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्या मागून येत असलेल्या काही नागरीकांनी त्यांना पाहिले असता गावात येऊन ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी हलविले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविले होते.

आर्थिक परिस्थिती जेमतेम

बापु शिरसाठ यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांच्या डोक्याला, कानाला फटका बसला होता. त्यांचा मेंदू, कान, एका बाजूच्या हात व पाय पूर्णतः निकामी झाला होता. यावेळी घरातील कर्त्या व्यक्तीवर ही परिस्थिती ओढावल्याने त्यांची पत्नी, मुले यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने गावातील ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करुन रुग्णालयात दाखल केले. मात्र आज उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून पच्यात अपंग आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT