ठाकरे सेनेचा मेळावा सोनिया गांधी, पवारांच्‍या विचारांचा; गुलाबराव पाटलांनी साधला निशाणा

ठाकरे सेनेचा मेळावा सोनिया गांधी, पवारांच्‍या विचारांचा; गुलाबराव पाटलांनी साधला निशाणा
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv
Published On

जळगाव : शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्‍याबाबत रस्‍सीखेच सुरू आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा (Sonia Gandhi) सोनिया गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असल्‍याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? असा प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उपस्थित केला आहे. (Jalgaon News Gulabrao Patil)

Gulabrao Patil
गुलाबराव पाटलांनी फायद्यासाठी आजा बदलविला; अंबादास दानवेंचा पलटवार

सध्या राज्यात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) कुणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावरुन दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या दरम्‍यान गुलाबराव पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रीया मांडत ठाकरे सेनेवर निशाणा साधला आहे.

१२५ कोटी दिले तरी खड्डे का?

उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेचे (Shiv Sena) पदाधिकारी खूपच छान साहित्य यांनी वर्तमानपत्रात खड्ड्यांबाबत जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावर विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्री असताना १२५ कोटी रुपयांचा निधी देवूनही महापालिकेकडून खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. दुसरीकडे त्यांचाच पक्षाचा पदाधिकारी जळगाव शहरातले खड्डे दाखवत असल्याने शरमेची बाब असल्‍याचे ते म्हणाले.

सट्टा अड्ड्याचा निषेध

कोणत्याही पक्षाचे कार्यालय हे न्याय देवतेचे कार्यालय असते. त्यामुळे अशा ठिकाणी सट्टा अड्डा चालविणे ही निषेधार्थ बाब आहे. चुकीची गोष्ट असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी सट्ट्याचा अड्डा सुरू असलेला कार्यालय उधळून लावल आहे. त्‍यांचे स्वागत करत असल्‍याचे मंत्री पाटील म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com