Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जफेडीची विवंचना; रेल्वेसमोर उडी मारत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : शेतीसाठी सोसायटी व बँकेकडून कर्ज घेतले होते. शेतातून उत्पन्न चांगले न आल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते गेल्या काही महिन्यांपासून होते.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना (Jalgaon) जळगाव तालुक्यात घडली. लमांजन येथील शेतकऱ्याने कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान रेल्वेसमोर (Railway) उडी मारत आत्महत्या केली. सदरची घटना २ मार्चला सायंकाळी उघडकीस आली. (Live Marathi News)

लमांजन (ता. जळगाव) येथील कैलास भिवसन पाटील (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. कैलास पाटील हे पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. त्यांनी शेतीसाठी सोसायटी व बँकेकडून कर्ज घेतले होते. शेतातून उत्पन्न चांगले न आल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते गेल्या काही महिन्यांपासून होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान कैलास पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून २ मार्चला सायंकाळी कुऱ्हळदे ते शिरसोली दरम्यानच्या धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायलट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी एमआयडीसी (Police) पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: दिवस रात्र एक करुन अभ्यास केला,UPSC क्रॅक केली, दिव्यांग IAS ऑफिसर इरा सिंघल यांचा प्रेरणादायी प्रवास

Viral Video: बापरे...सोफ्याच्या आत सापांचा घोळका; VIDEO पाहून अंगाचा उडेल थरकाप

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

Dog paragliding with owner: कुत्र्याने केले मालकासोबत पॅराग्लायडिंग, असा 'थ्रील' योग्य की अयोग्य? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा 

SCROLL FOR NEXT