Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : दीड वर्षात २९ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; चाळीसगाव तालुक्यातील विदारक चित्र

Jalgaon News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडल्याने पेरणी करून हाती काहीही आले नाही.

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : अतिवृष्टीत पिकांचे नुकसान, वाया गेलेला हंगाम व कर्जबाजारीपणातून शेतकरी टोकाची (Jalgaon) भूमिका उचलत आत्महत्या करत असतात. काही केल्या आत्महत्येच्या घटना थांबत नाहीत. असेच विदारक चित्र (Chalisgaon) चाळीसगाव तालुक्यात पाहण्यास मिळत असून मागील दीड वर्षात २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (Latest Marathi News)

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) कर्ज काढून पेरणी केली. मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडल्याने पेरणी करून हाती काहीही आले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. यामुळे घरातील खर्च कसा भागवायचा, या विवंचनेने शेतकरी दिसून येत आहेत. यातूनच टोकाचे पाऊल उचलल्याचे कारणे समोर आली आहेत. गेल्या पंधरा महिन्यात तब्बल २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून मदतीसाठी १५ पात्र ठरले. तर पाच अपात्र असून यातील पाच तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकाच गावात ५ शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल 

सर्वाधिक घटनांमध्ये कर्जबाजारीपण हे महत्त्वाचे कारण आहे. पंधरा महिन्यात २९ याचा अर्थ प्रत्येक पंधरा दिवसाला एक आत्महत्या झाल्याची दिसून येते. चिंचगव्हाण येथे सर्वाधिक पाच आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे शासन दरबारी मदतीसाठी पात्र ठरली असून, संबंधित कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. त्यातील काहींना मदत मिळाली आहे तर पाच अपात्र झाली असून, काही प्रकरणे आजही प्रलंबित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या कलदगाव येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

सापांना आकर्षित करणारा वास कोणता? जाणून घ्या घरात शिरकावाचं खरं कारण

Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

Mumbai To Amruteshwar Temple: रेल्वेने, बसने की कारने? मुंबईवरून अमृतेश्वर मंदिराला जाण्याचे सर्वोत्तम पर्याय कोणते?

दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT