New Year Celebration
New Year CelebrationSaam tv

New Year Celebration : नववर्षाच्या पार्ट्यांवर करडी नजर; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक तैनात

Pune News : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नववर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात करण्यात येत असते. स्वागत करत असताना घरगुती म्हणा कि मित्रपरिवारांसोबत पार्टीचे नियोजन करण्यात आलेले
Published on

पुणे : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सारे सज्ज आहेत. यासाठी पार्ट्यांचे नियोजन देखील आतापासून (Pune) करून ठेवण्यात आले आहे. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या बेकायदा पार्ट्या तसेच (New Year) बनावट मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार आहे. (Maharashtra News)

New Year Celebration
Plastic Rice : रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ; घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नववर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात करण्यात येत असते. स्वागत करत असताना घरगुती म्हणा कि मित्रपरिवारांसोबत पार्टीचे नियोजन (New Year Celebrations) करण्यात आलेले आहे. परंतु काहीजण पार्टी करण्यासोबत मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करत असतात. तर काही मद्य विक्रेते बनावट मद्य विक्री करत असतात. अशा बनावट मद्य विक्री व बेकायदा पार्ट्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १७ पथके तैनात करण्यात आली असून या पथकात ५० अधिकारी आणि १२५ कर्मचारी तैनात आहेत. या पथकांकडून पुणे शहर व जिल्ह्यात गस्त घालण्यात येणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

New Year Celebration
Turmeric Crop : हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

कोल्हापूरमध्ये पर्यटकांची लूट 
कोल्हापूरमध्ये पर्यटक येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांकडून पार्किंगच्या नावाखाली काही महाभागांकडून लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबाबाई दर्शनाला आलेल्या पर्यटकांकडून पार्किंगसाठी जागा देतो सांगत शंभर ते दोनशे रुपये उकळण्याचा प्रकार सुरु आहे. अशा प्रकारे मागील आठवड्यात अनेक पर्यटकांकडून हजारो रुपये उकळले असून खाजगी वाहनांसाठी ठरवून दिलेल्या पार्कींगची जागा फुल्ल झाल्यानंतर ही लूट केली जात आहे. आता नववर्ष स्वागत आणि दोन दिवसांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या लुटारुवर नजर ठेवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com