Turmeric Crop : हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

Washim News: हळद पिकासाठीही पोषक वातावरण असल्यास हळद पीक जोमात बहरते. मात्र, अतिपाऊस किंवा अवकाळी पावसामुळे पिकावर परिणाम झालेला पाहण्यास मिळत आहे
Turmeric Crop
Turmeric CropSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवीन प्रयोग करत हळद पिकाचे उत्पन्न घेण्याकडे काही (Farmer) शेतकऱ्यांचा काळ असतो. मात्र वातावरणातील बदल, अवकाळी व=पावसामुळे हळदीच्या पिकावर देखील रोग पडण्यास (Washim) सुरवात झाली असून हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. (Tajya Batmya)

Turmeric Crop
CBI Action In Nashik : नाशिकमध्ये सीबीआयची कारवाई; दोन लाखाची लाच घेतांना पीएफ आयुक्तांसह दोन जण ताब्यात

हळद पिकासाठीही पोषक वातावरण असल्यास हळद पीक जोमात बहरते. मात्र, अतिपाऊस किंवा अवकाळी पावसामुळे (Rain) पिकावर परिणाम झालेला पाहण्यास मिळत आहे. हळद पिकालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वातावरणात अधिक काळ आर्द्रता असल्यामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. हळदीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Turmeric Crop
Plastic Rice : रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ; घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करीत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हळदीचे पिकांची लागवड केली. मात्र, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात आता वातावरणातील बदलामुळे अधिक काळ आर्द्रता असल्यामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने ५० टक्केच्यावर उत्पादनात घट होणार असल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com