सांगली : जत तालुक्यातील वळसघ येथील एका रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात (Sangli) प्लास्टिकचा तांदूळ आढळला. लाभार्थी घरी तांदूळ नीट करताना तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ (Rice) असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे याचा जाब विचारत स्वतः लाभार्थी कृष्णा कोळी यांनी पुरवठा निरीक्षक यांना निवेदन दिले.यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. (Live Marathi News)
अनेकवेळा पोषण आहार व रेशनचा पुरवठा करताना खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात. परंतु जत तालुक्यातील वळसघ येथे असलेल्या एका रेशन दुकानातून (Ration Shop) लाभार्थ्याला मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबर मिश्रीत तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा गंभीर प्रकार असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळल जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कारवाईची मागणी
मुळात रेशनच्या मालमध्ये प्लास्टिक तांदूळ कोठून आला, याचा तपस होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे रेशनच्या तांदळात प्लास्टिक तांदूळ आल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.