प्रमोद जगताप, प्रतिनिधी| ता. २९ डिसेंबर २०२३
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकालाची तारीख जवळ येत आहे. या निकालाआधीच शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.
आज दिल्लीत जागा वाटपसदर्भात पहिली बैठक होत आहे. कोणी कोणत्या जागा लढवाव्यात यावर चर्चा होईल. अशी माहिती विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच कॉंग्रेस २२ जागा लढवणार असल्याच्या चर्चांवर ही त्यांनी स्पष्टिकरण दिले. काँग्रेसने किती जागा लढाव्यात यावर मी बोलणार नाही. इंडियाआघाडीच्या (India Aaghadi) बैठकीत जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे.. असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यावेळी म्हणाले.
शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार, हे १०० टक्के खरं आहे असच होणार आहे. भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना (Ajit Pawar) कळेल, असे मोठे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच त्यांना विधानसभेच्या २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत किती जागा मिळतील हे कळेल..असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमधील कॉंग्रेसच्या रॅलीवरुन केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांचा चष्मा हा जवळचा आहे लांबचा नाही. त्यामुळे रॅली लांब होती जी त्यांना दिसली नसेल. त्यांचा चष्मा रिडिंगचा आहे ज्याचा जसा चष्मा तसे त्यांना दिसते.. असा टोला त्यांनी लगावला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.