रोहिदास गाडगे
अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे, असं म्हणणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, असं अमोल कोल्हे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून तगडा उमेदवार देऊन तो निवडून आणणार, असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला होता. तसंच अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे.
अमोल कोल्हे राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केल्यानंतर अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यात दोन उपमुख्यमंत्री दोघेही ताकदीचे नेते आहेत. सत्तेसाठी राज्यातले नेते केंद्रात जातात त्याच घाईने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी का जात नाही, असा थेट सवाल कोल्हेंनी केलाय. माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपली ताकद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरावी, असा इशारा देखील अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिलाय.
शिवस्वराज्य यात्रेसारखाच शेतकरी आक्रोश मोर्चात उत्साह आहे. मात्र काही नेत्यांची कमी जाणवत आहे, असे भावनिक विधान यावेळी कोल्हेंनी केलेय. शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंसोबत अजित पवार शेवटपर्यंत होते मात्र आज शेतकरी आक्रोश मोर्चातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना अजित पवारांची कमी जाणवत असल्याचे देखील अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
अर्धे मुख्यमंत्री वरुन उपमुख्यमंत्री हे पदच संविधानीक नाही एका पदावर दोन माणसं मग वेगळं काय म्हणणार. त्यांच्या पदाचा,नेतृत्वाचा मान ठेवून कळकळीची मागणी, कांदा खरेदी किती केली त्याला अनुदान दिलं हे स्पष्ट करावं. तेव्हाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली अन आताही तेच, अशी टीका अमोल कोल्हेंनी केलीये.
काय म्हणाले होते अजित पवार?
मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी कोल्हेंसाठी जिवाचं रान केलं. पण मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.