सुरज मासुरकर, मुंबई|ता. २८ डिसेंबर २०२३
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी खास रणनिती तयार केली असून नमो ॲपच्या माध्यमातून खासदारांच्या कामाचा सर्वे केला जाणार आहे. ज्यामधून त्यांचे भवितव्य ठरणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचे धक्का तंत्र पाहायला मिळू शकते. कारण भाजपच्या खासदारांची मागील पाच वर्षांची कामगिरी नमो ॲपच्या माध्यमातून तपासण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. या ॲपच्या माध्यमातून खासदारांच्या कामगिरीचा व जनमताचा कौल घेतला घेणार आहे.
नमो ॲपमध्ये (Namo App) "तुमच्या खासदारांची कामगिरी कशी वाटली", तसेच "लोकसभेसाठी सध्याच्या खासदाराव्यतिरिक्त दुसरे दोन पर्याय कोण आहेत?" त्यांची नावे देखील या ॲपमध्ये विचारण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप (BJP) आपला खासदार मतदार संघात लोकप्रिय आहे की नाही? याचा आढावा या 'नमो ॲप'च्या माध्यमातून घेणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नाशिकमधून फुटणार प्रचाराचा नारळ!
दरम्यान, नववर्षाच्या सुरूवातीलाच २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी राज्यातील भाजपचे सर्व मंत्री उपस्थित असतील. पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) या दौऱ्यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप लोकसभेचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.