मयुर राणे, मुंबई| ता. २८ डिसेंबर २०२३
अयोध्या नगरीमध्ये २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाहणार आहे. एकीकडे या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना राजकीय मैदानात मात्र जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झालेत. उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यावरुन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर सडकून टीका केली आहे.
"संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का? परंतु हा भाजपचा कार्यक्रम आहे, राम मंदिर उत्सव नाही. यूपीमध्ये आणि दिल्लीत भाजप सरकार आहे. मला वाटते प्रभू श्रीरामाचे अपहरण केले आहे. भाजपचा (BJP) कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ, आम्हाला आमंत्रणाची गरज नाही आम्ही स्वतःचा दर्शनाला जाऊ.. असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. तसेच निमंत्रण देणारे हे कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच "भारतीय संसदेचे उद्घाटन झाले तेव्हाही हाच प्रकार झाला. हे सर्व सोहळे एका पक्षाचे आहेत. त्याला राष्ट्रीय स्वरूप नाही .अशा प्रकारे कार्यक्रम होतात त्याला राष्ट्रीय स्वरूप आणलं पाहिजे हे राष्ट्राला समर्पित असावे. देशासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं. अयोध्येसाठी त्यांचं काहीच योगदान नाही ते राम मंदिर उत्सव करत आहेत.." अशी खोचक टीकाही राऊतांनी यावेळी केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेवरुनही (Bharat Nyay Yatra) प्रतिक्रिया दिली. "भारत आणि सर्वांना जोडण्याचं काम राहुल गांधी यांनी पहिल्या यात्रेमध्ये केले आहे. या देशाचे संविधान वाचवण्याचं काम करायचं आहे. त्यामुळे ही संकल्पना घेऊन राहुल गांधी भारत न्याय यात्रा घेऊन यात्रा काढत आहे त्याचे आम्ही स्वागत करत आहोत. राहुल गांधी (Rahul Gandhi निघाले आहेत आणि जनता त्यांच्यासोबत आहे..." असे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.