Will Eknath Shinde group merge with BJP Shiv Sena 16 MLAs Disqualification Case Latest Updates
Will Eknath Shinde group merge with BJP Shiv Sena 16 MLAs Disqualification Case Latest UpdatesSaam Tv

Maharashtra Politics: सर्वात मोठी बातमी, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? पडद्यामागे काय घडतंय?

Mla Disqualification Case: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांची दिली आहे.
Published on

Shiv Sena 16 MLAs Disqualification Case

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांची दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Will Eknath Shinde group merge with BJP Shiv Sena 16 MLAs Disqualification Case Latest Updates
Anjali Damania on Ajit Pawar: अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना कार वाटप; अंजली दमानिया यांनी उपस्थित केले ६ प्रश्न

दोन्ही गटाची सविस्तरपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर येत्या १० जानेवारीला यासंदर्भातील निकाल देण्यात येणार आहे. मात्र, या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाच्या (Eknath Shinde) १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं. किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील, अशी रणनीती भाजपने आखल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. कोर्ट यावर काय निर्णय घेईल, याकडे देखील भाजपचे लक्ष असेल.

सुप्रीम कोर्टाने जर शिंदे यांना अपात्र ठरवले तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. तशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीसोबत तातडीने विधानसभेच्या निवडणुका घेण्याची भाजपची इच्छा नाही.

त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाला उशीर झाला, तर तो शिंदे गटाच्या पथ्यावर पडेल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. दरम्यान, मार्चच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अपात्रतेबाबत निकाल दिला तर शिंदे आणि भाजपची अडचण होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता भाजपने रणनीती आखल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Will Eknath Shinde group merge with BJP Shiv Sena 16 MLAs Disqualification Case Latest Updates
Maratha Reservation: मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, CM शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक; नेमकं काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com